हिंदी छोट्या पडद्यावरूनन आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर ती फारशी छोट्या पडद्यावर दिसली नाही. ती सिनेमांमध्येच जास्त रमली. मात्र आता प्रार्थना तब्बल १० वर्षांनंतर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागम करणार आहे. या निमित्ताने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील तिचा प्रोमो शेअर केलाय. त्यावर कॅप्शन देत लिहिलयं की, ‘१० वर्षांनी टिव्ही वर पुनरागमन करते आहे... तुमच्या घरातली, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी... तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच सदिच्छा...!!! तुमचीच प्रार्थना बेहेरे !!!…’. गेली दोन वर्ष प्रार्थना सिनेमांपासून दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटताना आनंद होत असल्याचं प्रार्थानाच्या या पोस्टवरून कळते. तिच्या या पोस्टवर तिच्या मनोरंजन क्षेत्रातील मित्रपरिवाने तिला शुभेच्छा दिल्यात.

Snehalvo
#PrarthanaBehere #माझीतुझीरेशीमगाठ #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber